महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019:  नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये BKC वर आज महायुतीची संयुक्त सभा
Narendra Modi (Photo Credits: Twitter/ JPNadda)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Elections)  च्या रणधुमाळीमध्ये आता प्रचाराचे शेवटचे 2 दिवस उरले आहेत. महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या महायुतीची प्रचार सभा आज मुंबईमध्ये पार पडणार आहे. महायुतीच्या सभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत. नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौर्‍याची सांगता आज (18 ऑक्टोबर) दिवशी मुंबईत होणार आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 9 सभा घेतल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदान यंदा 21 ऑक्टोबर दिवशी पार पडणार आहे. या निवडणूकीसाठी शिवसेना 124, भाजपा 150 आणि इतर 14 जागांवर लढणार आहेत. सध्या महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे सरकार आहे. आज नरेंद्र मोदी मुंबईमध्ये बीकेसी मैदानावर सभा घेणार आहेत. आज मुंबईकरांसमोर नरेंद्र मोदी काय बोलणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान यंदा मोदींनी विरोधकांकडून कलम 370 रद्द करण्यावरून होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. नक्की वाचा - सातारा ही माझी गुरुभूमी; पंतप्रधान मोदी यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा

नरेंद्र मोदी मुंबई सभा 

21ऑक्टोबर दिवशी मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर दिवशी संपणार आहे.