महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर साऊथ वेस्ट मधून दाखल केला उमेदवारी अर्ज
Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (4 ऑक्टोबर) आमदारकीचा अर्ज दाखल केला आहे. नागपूरमध्ये भाजपाने शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या उमेदवारांची रॅली काढली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमधील साऊथ वेस्ट विधानसभा जागेवरून निवडणूक लढणार आहे. पुन्हा एकदा भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी आपला आमदारकीचा अर्ज दाखल केला आहे. नागपूर: नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा उमेदवारांच्या रॅलीला सुरूवात; आज भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीन गडकरी यांच्या घरी दाखल झाले होते. तेथे त्यांचे औक्षण  करण्यात आले. मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे.

ANI Tweet 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे 2 आठवडे बाकी आहेत. 21 ऑक्टोबर दिवशी मतदान तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी होणार आहे.