Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: पोस्टल मतमोजणीमध्ये कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर

महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीच्या संघर्षामध्ये आज महाराष्ट्रातील जनतेने कुणाच्या बाजूने कौल दिला याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.

23 Nov, 13:46 (IST)
महाविकास आघाडी विरूद्ध महायुती मध्ये कांटे की टक्कर सुरू झाली आहे. सुरूवातीला पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामुळे नाना फडणवीस, देवेंद्र फडणवीस, युगेंद्र पवार हे आघाडीवर आहेत.
23 Nov, 13:57 (IST)
महाराष्ट्रामध्ये पोस्टल मतमोजणी ला सुरूवात झाली आहे. 288जागांवरील मतमोजणी मध्ये मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असणार आहे याचा खुलासा थोड्याच वेळात होणार आहे.
23 Nov, 14:08 (IST)
पहिल्यांदा निवडणूकीमध्ये उतरलेले मनसेचे अमित ठाकरे, भाजपाच्या  श्रीजया चव्हाण आघाडी वर  आहेत. सुरूवातीला पोस्टल मतमोजणी सुरू आहे. हळूहळू 288 जागांवरील निकाल स्पष्ट होणार आहेत.  महायुती पोस्टल मतमोजणी मध्ये आघाडीवर आहेत. एकूण 200 जागांचे कल समोर आले आहेत.
23 Nov, 14:18 (IST)
पोस्टल मतमोजणीमध्ये कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर आहेत तर इस्लामपूर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आघाडीवर आहेत.

महाराष्ट्रामध्ये आज 288 विधानसभा (Vidhan Sabha) जागांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. 15 व्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले आहे आता या मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर सुरूवातीला कल आणि अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक 6 प्रमुख पक्षांमध्ये लढली गेली आहे त्यामुळे या निवडणूकीच्या निकालांकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. पहिल्यांदाच राज्यात सुमारे 65% मतदान झाले आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार? हे पाहणं उत्सुकतचे ठरणार आहे.

महाराष्ट्रात निवडणूकांपूर्वी शिंदे सरकार ने आणलेली लाडकी बहीण योजना, शिवसेना, एनसीपी पक्ष फूटीनंतर बदललेलं राजकारण ते मनसे फॅक्टर, आरक्षण या सार्‍यांचा या मतदानात किती आणि कसा प्रभाव पडणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आणि सट्टाबाजाराच्या अंदाजानुसारही राज्यात महायुतीचं सरकार येणार असा अंदाज आहे.

महायुती विरूद्ध महा विकास आघाडी या लढाई मध्ये कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण ही निवडणूक मनसे साठी देखील महत्त्वाची आहे. आजच्या निकालानंतर 26 नोव्हेंबर पर्यंत नवं सरकार स्थापनं करावं लागणार आहे. अन्यथा महाराष्ट्रात मागील निवडणूक निकालानंतर जशी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती तशीच राष्ट्रपती राजवट यंदाही लागू करावी लागणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement