नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिछाडीवर, भाजपसाठी चिंताजनक स्थिती
CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झालेले भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2019 च्या निवडणुकीत पिछाडीवर आहे. ही सर्वात मोठी धक्कादायक बातमी असली तरी मतमोजणीच्या सर्व फे-या पुर्ण व्हायच्या असून अंतिम निकाल येणे बाकी आहे. मात्र तरीही निकालाच्या दुस-या-तिस-या फेरीतच फडणवीसांची पिछाडी ही चिंताजनक बाब असल्याचे दिसत आहे.

फडणवीसांविरुद्ध 2014 साली काटोल मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख रिंगणात उतरले आहेत. आशिष देशमुख यांनी 2 ऑक्टोबर 2018 रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून काटोलची जागा रिक्त होती. मात्र आता ते नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढणार असून फडणवीस विरुद्ध देशमुख हे बिग फाईट असल्याचे बोलले जात आहे.

हेदेखील  वाचा- नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: नागपूर दक्षिण-पश्चिम ते नागपूर मध्य चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचारसभेत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सुद्धा विरोधी पक्षावर निशाणा साधत "असे 100 कोल्हे आले तरी आम्ही एकटेच सिंह आहोत आणि सिंहाची शिकार होत नाही"  अशा शब्दात चिमटा घेतला आहे. 12 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम (Nagpur South West ) मतदारसंघात घेण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधक तुल्यबळ नसल्याने निवडणुकीत मजाच येत नाही असे म्हणत टोलावले होते.

इतकच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. फडणवीस यांनी भाषणात , “माझ्या विरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, नितीन गडकरी यांच्याविरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, अशा पळपुटांना आमच्या विरोधात का उभं करता?, त्याऐवजी चांगला पैलवान उभा करा असा सल्ला विरोधकांना दिला होता.

थोडक्यात नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सध्या अटीतटीची लढत सुरु असून काही तासांतच अंतिम निकाल हाती येईल असे सांगण्यात येत आहे.