महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election) राज्यातील 288 जागांसाठी आज (सोमवारी) मतदान होत आहे. आज अनेक दिग्गजांनी तसेच कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Master Blaster Sachin Tendulkar) पत्नी अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरसह (Arjun Tendulkar) वांद्रे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सचिनने मतदारांना आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी मतदान करा, असं आवाहन केलं. मतदान करणं हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे मी माझ मत नोंदवलं आहे. तुम्हीही मतदान करून आपला हक्क बजवा आणि लोकशाहीच्या सोहळ्यात सहभागी व्हा, असंही सचिन यावेळी म्हणाला.
सचिन तेंडुलकर ट्विट -
मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझं मत मी नोंदवलं आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा.
Happy to have voted & fulfilled my responsibility. Let’s turn out in large numbers to vote & be part of a vibrant democracy.#MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/S1zQXtqEQc
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 21, 2019
आज सकाळपासून केंद्रीय नेते नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुधीर मुंनगंटीवार, उदयनराजे भोसले, एकनाथ शिंदे, अविनाश जाधव, सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, इम्तियाज जलील, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक यांच्यासह आदी राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यात मतदान होत आहे. राज्यात 8 कोटी 97 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. तसेच हे मतदान निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात 95,473 मुख्य तर 1,188 सहाय्यक अशी एकूण 96 हजार 661 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.