महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
Election Commission of India | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Elections)  साठी यंदा 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी उमेदवार आज (27 सप्टेंबर) पासून त्यांचे उमेदवार अर्ज भरण्यास सुरूवात करणार आहेत. तर या अर्जाची छाननी होणार आहे. यंदा उमेदवारांना 4 ऑक्टोबर पर्यंत आपला उमेदवार अर्ज भरण्याची मुभा आहे. तर 7 ऑक्टोबर पर्यंत निवडणूक आयोगाच्या छाननीनंतर टिकलेले अर्ज मागे घेण्याची परवानगी आहे. राज्यात 288 विधानसभा जागांवर मतदान पार पडणार आहे आणि 24 ऑक्टोबर दिवशी या निवडणूकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून ढगफुटी झाल्यानंतर अतिवृष्टी झाली आहे. मात्र त्याचा परिणाम निवडणूक कामकाजावर होणार नसलयाचं सांगण्यात आलं आहे.

निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सारेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा,शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्याला सुरूवात झाली आहे. मात्र सत्ते असलेल्या शिवसेना - भाजपा युतीने अद्याप जागावाटप आणि युतीची घोषणा झाली नाही. लवकरच त्याची घोषणा येईल. विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरला! भाजप 144, शिवसेना -126 जागांवर लढणार, मित्रपक्षांची 18 जागांवर बोळवण: सूत्र

महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करतील. राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच हे नियम अधिक कडक असल्याने त्याचे काटोकोर नियमन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.