Maharashtra Rains: ठाण्यात झाडे उन्मळून 3 वाहनांचे नुकसान; कोणतीही जीवितहानी नाही
Thane (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. याचा सर्वाधिक फटका ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे. ठाणे जिल्ह्यात मागील सहा तासांत 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावत ठाण्यात अक्षरश: झाडाझडती घेतली आहे. जोरदार पावसाने ठाणे (Thane) शहरातील महात्मा फुले नगरातील श्री अयप्पा मंदिराजवळ झाडे झाडे उन्मळून तीन वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. दरम्यान कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रादेशिक आपत्ती समिती आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह सभोवतालच्या परिसरात ढगांची गर्दी झाल्याचे रडार व सॅटेलाइट इमेजेच्या माध्यमातून दिसत आहे. दक्षिण कोकणचा भागही ढगांनी व्यापला आहे. राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली आहे. हे देखील वाचा- Mumbai Rains: मुंबईत जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

एएनआयचे ट्वीट-

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 4 जुलै रोजी अधिक झाला होता. ज्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. तर, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती, तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली होती. दरम्यान, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागले होते.