चंद्रपूर: रस्त्यात अचानक चाक फुटल्यामुळे एका वाहनाला भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

रस्त्यात अचानक चाक फुटल्यामुळे एका वाहनाला भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. ज्यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना चंद्रपूर- नागपूर महामार्गावर (Chandrapur-Nagpur Highway) आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. हे तिघेही नागपूर येथून चंद्रपूरच्या दिशेने निघाले होते. मात्र, रस्त्यात अचानक त्यांच्या वाहनांचे चाक फुटल्याने हा अपघात झाला आहे. ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा मांगली गावातील नागरिकांनी मदत न करता पाहण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होते, अशीही माहिती समोर आली आहे.

सिद्देश पंढरीनाथ प्रभुसाळगावकर (वय 36, रा. तळवणे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) आणि सुनीलकुमार अग्रवाल (वय 40, मूळ रा. भरतपूर, राजस्थान, सध्या चंद्रपूर) तर, दशरथ पट्टे (वय 45, रा. चंद्रपूर) असे मृतांची नावे आहेत. यातील सुनीलकुमार अग्रवाल हे चंद्रपूरमधील ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीत कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही आज दुपारी नागपूर येथून चंद्रपूरला जात होते. परंतु, चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अचानक चाक फुटल्याने त्यांचे वाहनाने एका जोरदार धडक दिली. या अपघात सिद्देश, सुनीलकुमार आणि दशरथ या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक: पतीने आत्महत्या केल्याची पाहून पत्नीनेही त्याच हुकाला गळफास लावून संपवले स्वत:चे जीवन; पुणे येथील घटना

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक भागात अद्यापही वाहतूक ठप्प आहे. ज्यामुळे अपघाताच्या घटनेत घट झाली होती. परंतु, चंद्रपूर- नागपूर येथे आज घडलेल्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.