Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 4,878 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,74,761 वर
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

देशात गेले तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालू असलेल्या लॉक डाऊनमध्ये शिथिलता आणत, आता अनलॉक 2 ची घोषणा झाली. मात्र देशातील व राज्यातील कोरोना विषाणू संक्रमितांची संख्येत अजूनही सकारात्मक फरक पडला नाही. राज्यात आज 4,878 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व अशाप्रकारे एकूण संख्या आता 1,74,761 अशी झाली आहे. आज नवीन 1951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 90,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 75,979 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. आज राज्यात 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील 95 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहे व 150 मृत्यू हे पूर्वीचे आहेत. सध्याचा राज्याचा मृत्युदर हा 4.49 टक्के इतका आहे. महत्वाचे म्हणजे सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 50.02 टक्के इतका आहे. आतापर्यंतच्या 9,66,723 नमुन्यांपैकी, 1,74,761 इतक्या नमुन्यांची (18.07 टक्के) कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. सध्या राज्यात 5,78, 033 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत, 38,866 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (हेही वाचा: ठाण्यामध्ये 2 ते 12 जुलै या कालावधीमध्ये लॉक डाऊनची घोषणा; जाणून घ्या कोणत्या गोष्टी सुरु असतील व काय असेल बंद)

एएनआय ट्वीट -

सध्या तरी कोरोना व्हायरसवर कोणताही ठोस उपचार नाही. अशावेळी रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे हे महत्वाचे आहे. हाच विचार करून, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील सुमारे 5 कोटी जनतेला अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषध मोफत देण्यात येणार आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना बहाल करण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली. दुसरीकडे आज पीएम नरेंद्र मोदी यांनी घोषणा करीत, ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ ही नोव्हेंबरपर्यंत लागू असल्याचे सांगितले आहे. यामुळे 80 कोटी गरिबांना पुढील 5 महिने मोफत अन्न मिळणार आहे.