गेले काही दिवसांपासून वरुण राजा शांत असला तरी आता पुन्हा एकदा दमदार कमबॅक (Come Back) करत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह विदर्भात काल पासुन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने सकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे. मराठवाडा (Marathwada), पश्चिम महाराष्ट्रातील (North Maharashtra) आणि विदर्भाच्या विविध जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असुन हवामान विभागाकडून येलो अलर्ट (Alert) जारी करण्यात आला आहे. नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
विदर्भातील भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. शहरी भागात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तर मराठवाड्यासह (Marathwada) पश्चिम महाराष्ट्रात (North Maharashtra) देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगरात देखील सकाळ पासून पावसाच्या सरी बरसताना दिसत आहे. मुंबईतील पावसाचा प्रभाव मुंबईतील ट्राफीकवर (Mumbai Traffic) देखील दिसून येत आहे. (हे ही वाचा:- Railway Track: पुणे-नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा खोळंबा, कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा)
5 Sept:
🔸पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🔸5 व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
🔸गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
- IMD pic.twitter.com/xeM0SZj6x3
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 5, 2022
पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तरी येत्या गुरुवारपासून म्हणजे 8 सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशा सुचना हवामा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.