Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आमचे जेम्स बॉण्ड : शहाजी बापू पाटील
Shahaji Bapu Patil

काय झाडी, काय डोंगर म्हणत ट्रेंड करणारे शहाजी बापू (Shahji Bapu Patil) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आमचे जेम्स बॉण्ड (James Bond) आहे असं म्हणत शहाजी बापूंनी एकनाथ शिंदेंचं विशेष कौतुक केल आहे. एबीपी माझा (ABP Majha) यावृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत ते बोलत होते. शहाजी बापुंसह 40 बंडखोर आमदारांनी मुंबई (Mumbai) ते सुरत (Surat) आणि सुरत ते गुवाहाटी हा प्रवास कसा ओके मंदी झाला या बद्दल सविस्तर माहिती या मुलाखती दरम्यान दिली आहे. तसेच मी माझ्या माणदेशी भाषेतील मित्राशी संवाद करतानाचे वाक्य सगळ्या जगभर प्रसिद्ध झाले. त्यावर संजय राऊत (sanjay Raut) , आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली. संजय राऊत हे कुजके शरीर, कुचकी बुद्धी आणि कुजक्या मनाचा माणूस असल्याने ते काय बोलतात याला कोणी किंमत देत नाही, अशी खोचक टीका शहाजी बापूंनी  संजय राऊतांवर केली आहे.

 

तसेच मुंबईहून सुरतला जातांनाचा एक महत्वाचा किस्सा शाहजी बापूंनी सांगितला आहे.  मुंबईहून सुरतला जातांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. पण आमच्या आग्रहामुळं त्यांनी हे पाऊल उचललं असंही शहाजी बापूंनी स्पष्ट केलं. तसेच एकनाथ शिंदेसोबत असणारे सर्व आमदार मजबूत आणि विचार करणारे असल्याने यांनी कितीही प्रयत्न केले तरी यांच्यातील एकही आमदार आयुष्यात कधाही एकनाथ शिंदेंकडे पाठ फिरवणार नाही असही शाहजी बापूंनी सांगितलं. या मुलाखती दरम्यान शहाजी बापूंनी मोठ मोठे खुलासे केलेत तसेच संजय राऊत, उध्दव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. (हे ही वाचा:- Ajit Pawar: अजित पवारांकडून विदर्भातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागाचा विशेष आढावा)

 

आदित्य वयाने लहान असून संजय राऊत जे शिकवतात तेच ते बोलतात पण उद्धव साहेबांनी केलेली टीका अत्यंत चुकीची होती असे शहाजीबापू यांनी सांगितले. सध्या त्यांच्या चिडखोर स्वभावामुळे आपण काय बोलतो याचे भान राहिले नसल्याने ते असे बोलले असतील असा टोला लगावला. शहाजी बापूंनी उध्दव ठाकरेंसह संजय राऊतांवर आक्रमक होत तर एकनाथ शिंदेबाबत भावनिक होत ही मुलाखात दिली आहे.