महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 151 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण तर 5 जणांचा मृत्यू
Maharashtra Police (Photo Credits: Twitter/ ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 151 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.(Maharashtra Unlock 4: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिम चालक, मालकांना दिलासा, म्हणाले 'सरकार सकारात्मक पण..')

राज्यात पोलीस दलातील एकूण 14,792 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 2772 अॅक्टिव्ह रुग्ण असून 11,867 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच 153 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. या कोरोनाच्या परिस्थितीत पोलीस दलातील 55 वर्ष अधिक वय असलेले कर्मचारी काम करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. (COVID-19 Cases in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरीसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण?)

दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 14,361 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले असून 331 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 लाख 47 हजार 995 इतकी झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 23 हजार 775 वर पोहोचला आहे. सद्य घडीला राज्यात 1 लाख 80 हजार 718 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल दिवसभरात 11 हजार 607 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 5 लाख 43 हजार 170 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.