महाराष्ट्र पोलिस  दलाने 24 तासांत गमावले 3 कोव्हिड योद्धे; एकूण 54 कर्मचार्‍यांची कोरोना विरूद्ध झुंज अपयशी
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्र पोलिस दलामध्येही कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. आज (25 जून) देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलातील 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे (Coronavirus)  मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोविड 19 मुळे दगावलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची संख्या आता 54 पर्यंत पोहचली आहे. तर राज्यामध्ये आतापर्यंत 3239 पोलिसांनी कोरोना व्हायरसमुळे बळावलेल्या कोविड 19 (Covid 19) वर मात केली आहे. राज्यात अजूनही 991 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र पोलिस दलामध्ये आज 38 कर्मचार्‍यांना मागील 24 तासांत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. BYJU’S ने महाराष्ट्र पोलिस खात्यातील कर्मचार्‍यांसाठी खुले केले मोफत क्लास!

भारतामध्ये दिवसागणिक वाढणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये महाराष्ट्रात आजही सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये काल राज्यात 24 तासामध्ये 3,890 कोरोनाग्रस्त रुग्ण समोर आले आहेत. तर 208 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1,42,900 पर्यंत पोहचली आहे. तर 6739 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ANI Tweet 

मुंबई मध्ये आता हळूहळू कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला यश आलं आहे. मुंबईत काल 24 तासामध्ये 1 हजार 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 38 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 69 हजार 625 वर पोहचली आहे. यापैंकी 3 हजार 962 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 37 हजार 10 जणांना कोरोनावर मात केली आहे.