Maharashtra: राज्यात येत्या काळात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक लाख घर उभारली जाणार- अनिल देशमुख
Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

Maharashtra:  राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभुमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिली आहे. त्यानुसार राज्यात येत्या काळात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक लाख घरांची उभारणी करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. याबद्दल ते एबीपी माझा यांच्यासोबत बोलत होते. त्याचसोबत महाराष्ट्रात शक्ती कायद्याचा मुद्दा येत्या अधिवेशनात मांडला जाईल असे ही देशमुख यांनी म्हटले आहे.(Sudhir Mungantiwar on Thackeray Government: फडणवीसांचे सरकार गेले फसवणाऱ्यांचे सरकार आले, सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल)

अनिल देशमुख यांनी पुढे असे ही म्हटले की, पोलीस दलात जवळजवळ साडेबारा हजार रिक्त जागांवर नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला. पण मराठा आरक्षणामुळे भरतीची प्रक्रिया लांबवणीवर गेली. परंतु कोणत्याही समाजावर अन्याय न होऊ देता भरती प्रक्रिया सुरु केली जाईल असे ही देशमुख यांनी म्हटले आहे. त्याचसोबत पहिल्या टप्प्यात साडेपाच हजार रिक्त पदांवर तर दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.(BMC Elections 2022: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना एकटी लढणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट)

देशमुख यांनी विरोधकांवर ही टीका केली. विरोधक महाविकास आघाडीचे सरकार पडणार आणि त्यांचे सरकार येणार असल्याचे म्हणत होते. पण ही फक्त त्यांची स्वप्नेच आहेत. त्याचसोबत फडणवीस यांनी आमचे पुढील पाच वर्ष सरकार राहील असे म्हटले होते. मात्र त्यांचे सरकार पडून महाविकास आघाडीचे सरकार आले. तसेच भाजपचे नेते वारंवार राज्यपालांची भेट घेताना दिसून येतात. राज्यात राजवट लागू करता येईल का यासाठी सुद्धा कुरापती करतात अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.