महाराष्ट्रात पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 346 जणांना कोरोनाची लागण तर 2 जणांचा बळी
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून झपाट्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 346 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन जणांचा गेल्या 24 तासात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात 55 वर्षाहून अधिक वय असलेले कर्मचारी काम करणार नाहीत असा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या परिस्थिती गांभीर्य ठेवत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लॉकडाऊन हळूहळून उठवला जाईल असे स्पष्ट केले आहे.

पोलीस दलात एकूण कोरोना पॉझिटिव्हची प्रकरणे ही 14,641 वर पोहचली आहेत. तसेच 2741 अॅक्टिव्ह रुग्ण असून 11,752 जणांची प्रकृती सुधारली आहे. त्याचसोबत 148 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोविड19 मुळे मृत्यू झाला आहे.(महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेत्यांसह त्यांच्या स्वीय सहायकांना कोरोना चाचणी RT PCR बंधनकारक)

दरम्यान, महाराष्ट्रात काल कोरोनाचे आणखी 14,718 रुग्ण आढळून आले असून 355 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोविड19 चा आकडा 7,33,568 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या 5,31,563 रुग्णांची प्रकृती सुधारली असून एकूण 23,444 वर पोहचला आहे. त्याचसोबत 1,78,234 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. कोविड योद्धे सुद्धा कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत