मुंबई हवामान वेधशाळेने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (12 जुलै) पासून महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये (Konkan) आज मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसा अंदाज IMD GFS आणि WRF कडून देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठीदेखील मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई शहरामध्ये आज सकाळी काही ठिकाणी 15-20 मिनिटांसाठी जोरदार सरी कोसळल्या आहेत. या दमदर पावसानंतर मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतली आहे.
कोकणामध्ये मात्र मागील काही दिवसांपासून पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरूच असून त्यामध्ये आज भर पडणार आहे. कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे मागील काही तासांत दरड देखील कोसळली होती. आता हळूहळू दरड कोसळल्याने मंदावलेली वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने काही ठिकाणी पूर सदृश्य स्थिती देखील पहावयास मिळाली.
KS Hosalikar Tweet
Next 24 hrs rainfall forecast as per the IMD GFS and WRF guidance mod to heavy possibilities of rains over the konkan coast today.
Interior of state moderate RF pic.twitter.com/Toi9Ih29Go
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 12, 2020
आज दिल्ली सह उत्तर भारतामध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या देशभर कोरोना संकट असताना पावसाळी आजारांनी डोकं वर काढू नये म्हणून खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये विनाकरण पावसात भिऊ नका, सर्दी, ताप, खोकला ही लक्षणं अंगावर काढू नका. तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचेही आवाहन करण्यात आलं आहे.