Pune: पुण्यातील एका तरूणाच्या डोक्यात दगड घालून निघृण हत्या, कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुण्यातील एका तरूणाच्या डोक्यात दगड घालून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) मांगडेवाडी (Mangdewadi) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नव्याने खरेदी केलेल्या जमिनीवर वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने ही हत्या झाल्याची पोलीस चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन संपत चवडकर (वय 32) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. मोहन हा नऱ्हे येथील एका कंपनीत कामाला आहे. तर विकास चव्हाण आणि सचिन डाकले असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विकास आणि सचिन या दोघांनी काही दिवसांपूर्वी एक प्लॉट विकत घेतला होता. परंतु, या प्लॉटसाठी वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने विकास आणि सचिन या दोघांनी मोहनच्या हत्येचा कट रचला. दरम्यान, मंगळवारी रात्री मृत मोहन चवडकर आपल्या घराशेजारी अर्धवट बांधकाम झालेल्या ठिकाणी आपल्या ओळखीच्या लोकांसोबत मद्यपान करत बसला होता. परंतु, रात्री उशीर झाल्यानंतरही मोहन घरी न आल्याने त्याचे नातेवाईक त्याला पाहायला गेले. त्यावेळी मोहनचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत ठेचलेल्या अवस्थेत आढळला. हे देखील वाचा- Maharashtra: नागपूर मध्ये लॉकडाउनदरम्यान महिलेकडून विक्री केल्या जाणाऱ्या भाज्या फेकून देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात योग्य कारवाई केली जाणार

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिासांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अधिक शोध घेत असताना पोलिसांना 2 व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली. त्यानंतर चौकशी दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवताच या दोघांनीही हत्येची कबुली दिली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच या प्रकरणातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांचे नातेवाईक करत आहेत.