महाराष्ट्रात अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत छत्री, रेनकोटचाही समावेश; कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
Mantralay (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना राबवल्या जात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये, याचीही सरकारकडून काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रात लवकरच पावसाचे आगमन होणार असून राज्य सरकारकडून (State Government) अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये छत्री (Umbrella) आणि रेनकोटचाही (Raincoats) समावेश करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळ्यात नागरिकांचे हाल होऊ नये, याकरिता राज्य सरकारने येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये छत्री रेनकोटचाही समावेश करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात साधरणत: मे महिन्याच्या अखिरेस पावसाला सुरुवात होते. तर, सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यात पावसाच्या सरी बरसतात. या कालावधीत राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाच्या तोंडावर नागरिक छत्री आणि रेनकोट खरेदी करायला सुरवात करतात. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांच्या हितासाठी योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ठोस पावलेही उचलली जात आहेत. यातच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे राज्यभरातून कौतूक होत आहे. हे देखील वाचा- Maharashtra Police: महाराष्ट्रातील 1,061 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; 9 जणांचा मृत्यू

भारतात यावर्षी मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या सुधारित तारखांचा अहवाल आज प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यात केरळात पाऊस 4-5 दिवस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळवर यावर्षी नैऋत्य मॉन्सूनची सुरुवात चार दिवस उशिरा होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शुक्रवारी व्यक्त केली. मान्सूनच्या सुरुवातीच्या तारखेनंतर चार दिवसांनी  जूनपर्यंत दक्षिणेकडील राज्यात प्रवेश करण्याची जास्त शक्यता आहे.