आदित्य ठाकरे याने विश्वासदर्शक ठरावात उच्चारलेल्या केवळ 4 शब्दांवर नेटकरी झाले खुश; पहा काय म्हणतायत?
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे याने आज विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी व विधानसभा सदस्यत्व पदाची शपथ घेताना आपलय नावाचा केला उच्चार नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून सोशल मीडियावरून आदित्यचे कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल आज विधानसभा अधिवेशनात (Assembly Session) लागला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रणित महाविकास आघाडीने (Mahavikasaaghadi) विश्वासदर्शक ठरवायची अग्निपरीक्षा पार करत अखेरीस बहुमत सिद्ध केले व अंतिमतः राज्य सरकार स्थापन झाले. आजच्या या विधानसभा अधिवेशनात शिवसेना (Shivsena) पक्षाच्या अनुषंगाने पाहायला गेल्यास अनेक महत्वपूर्ण क्षण घडले. एक म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इतक्या वर्षातील राजकीय कारकीर्दीतील हे पहिले अधिवेशन होते तर त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासाठी देखील सदस्यत्व शपथविधीनंतर अधिवेशन रूपातील हा पहिलाच अनुभव होता. यावेळी आदित्यने भाषण देण्याचे टाळले असले तरी त्याने उच्चारलेल्या केवळ चार शब्दांवर नेटकरी बरेच खुश झालेले दिसून येत आहेत.
झालं असं की, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार खुले मतदान घेण्यात आले ज्यासाठी प्रत्येकाने आपले नाव सांगत एक शिरगणती घेण्यात आली. आदित्यने ज्यावेळेस आपले नाव उच्चारले तेव्हा वडिलांच्या नांवासोबतच त्याने आपली आई रोशनी ठाकरे यांच्या नावाचा देखील आवर्जून उच्चार केला, यानुसार आदित्य रश्मी उद्धव ठाकरे अशी ओळख त्याने करून दिली. आपल्या वडिलांसोबतच आईलाही तितकाच मान देण्याच्या त्याच्या या विचारावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
पहा ट्विट
आदित्यने यापूर्वी विधानभेच्या सदस्यत्व पदाची शपथ घेताना सुद्धा आपली अशीच ओळख करून दिली होती, तसेच बाळासाहेब थोरात, रोहित पवार यांनी देखील हा फॉरमॅट आवर्जून वापरला होता.
यंदा विधानसभेत अनेक नवे चेहरे नवनिर्वाचित आमदार म्ह्णून पाहायला मिळाले होते, यामध्ये आदिती तटकरे, ऋतुराज पाटील यांचा देखील समावेश होता. आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान नाही; ऐवजी देणार 'ही' टॉप भूमिका - सूत्र
दरम्यान, आजच्या अधिवेशनात ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन केली आहे, तर दुसरीकडे विधानसबाहेच्या कामकाजावर आक्षेप घेत भाजप आमदारांनी आज पहिल्याच दिवशी विधानसभेत सभात्याग केला होता. येत्या काळात हे बहुमत टिकवून नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोणते महत्वपूर्ण निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.