महाराष्ट्र: Mahajobs पोर्टलवर उमेदवारांना रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी Domicile Certificate सादर करणे अनिवार्य असणार, सुभाष देसाई यांची माहिती
Subhash Desai (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे अनेकांचे हाल झाल्याचे दिसून आले आहेत. खासकरुन हातावर पोट असणाऱ्यांना सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कामाची संधी नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच राज्य सरकारने कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकू नये किंवा त्यांच्या पगारात घट करु नये असे आवाहन ही केले आहेत.तरीही काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. त्याचसोबत परराज्यातील मजुरांनी सुद्धा आपल्या घरी वापसी केल्याने आता त्यांच्या जागी कोण काम करणार हा सुद्धा मोठा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. याच दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने महाजॉब्स पोर्टलचे (Maha Job Web Portal) उद्घाटन करण्यात आले. तर आता महाजॉब्सवर रजिस्ट्रेशन करताना इच्छुक उमेदवारांना डोमेसाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate)  सादर करणे अनिवार्य असणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

महाजॉब्स पोर्टलबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, औद्योगिक कामगारांचे ब्युरो या निमित्ताने हे पोर्टल स्थापन करण्यात आलेले आहे. स्थानिक कामगारांना नोकऱ्या मिळवून देणे हे एक महत्वाचे काम असल्याने उद्योगविभागाकडून औद्योगिक कामगार संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. यासाठी जे पोर्टल तयार करण्यात आलेले महाजॉब्स असे नाव देण्यात आलेले आहे. येथे इच्छुक असलेल्या उमेदवाराने त्याचे शिक्षण आणि त्याच्या संबंधित सर्व माहिती देणे अत्यावश्यक असणार आहे. तर भुमिपुत्रांना याचा फायदा मिळावा म्हणून डोमेसाईलची अट ठेवण्यात आली आहे. तसेच 80 टक्के स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या असे जे राज्याचे धोरण आहे ते पाळले जाणार असल्याचे ही देसाईल यांनी म्हटले आहे. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन; 'ही' आहेत Mahajobs ची प्रमुख वैशिष्ट्ये)

उमेदवारांना mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.तसेच विविध प्रकारच्या कंपन्यांचा यामध्ये समावेश असून त्यांना कोणत्या प्रकारच्या कामगारांची गरज आहे त्याबद्दल ही माहिती उपलब्ध करुन देणार आहेत. राज्यातील बेरोजगारी दूर व्हावी हा जॉब पोर्टलाचा मुख्य उद्देश असल्याचे ही सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील बेरोजगार कामगारांना दिलासा मिळणार असून नोकरची संधी सरकारने उपलब्ध करुन दिली आहे.