Maharashtra Corona Update: राज्यातील कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ; मुंबई, ठाण्यात सर्वाधिक रुग्ण
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

राज्यातील कोरोना (Coronavirus) संक्रमितांची संख्या हळूहळू वाढत आहे. जून महिन्यात शाळा सुरु होतात. अशात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण लक्षणीय राहिले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात आज (शनिवार, 11 जून) कोरोना संक्रमितांची संख्या 2701 इतकी आढळून आली. एकूण 2701 पैकी एकट्या मुंबईतच 1765 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यात आज दिवसभारात एकाही कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात 1327 रुग्ण वैद्यकीय उपचार घेतल्यावर बरे होऊन घरी परतले. राज्यातील कोरोना मुक्तांची एकूण संख्या 77,41, 143 इतकी झाली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आसून, तो आकडा 98% वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना संक्रमितांचा मृत्यूदरही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. तो 1.87% इतका झाल्याचे आरोग्य विभाग सांगतो. मृत्यूदर कमी झाला असला तरी राज्यातील सक्रीय रुग्णांचे प्रमाण मात्र पुन्हा वाढू लागले आहे. आज दिवसभरातच वाढलेला आकडा लक्ष्यवेधी आहे. एकूण राज्याचा विचार करता एकट्या मुंबईत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या पाहता ती 7000 इतकी झाली आहे.मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण (1482) आहेत. (हेही वाचा, COVID 19 चा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक; सार्वजनिक विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र)

दरम्यान, राज्याच्या तुलनेत देशाचा विचार करता संबंध देशात पाठिमागील 24 तासात 8329 नव्या कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे. सक्रीय रुग्णांची संख्याही 40,370 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना संक्रमितांचा Positivity Rate हा 2.41% तर आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर हा 1.75% वर पोहोचला आहे. पाठीमागील 24 तासात 4,216 कोरोना संक्रमित उपचार घेऊन बरे झाले. त्यामुळे कोरोना संक्रमनातून मुक्ती मिळवणाऱ्यांची संख्या 4,26,48,308 इतकी झाली आहे. देशातील कोरोना संक्रमितांची संख्या कमी होत आहे.