Maharashtra Budget 2020-21: महाराष्ट्र अर्थसंकल्प नव्हे, अर्थमंत्र्यांचं जाहीर सभेतील भाषण; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारच्या बजेट वर टीका
Devendra Fadnavis | (Photo Credit: Facebook)

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा पहिला वाहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सादर केला, यावेळी शेतकरी, महिला, व तरुणांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या, मात्र या सर्व घोषणा अर्थमंत्र्यांच्या जाहीर सभेतील भाषणासारख्या आहेत त्याला आकडेवारी किंवा आर्थिक संतुलनाचा पायाच नाहीये अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. अर्थसंकल्पात केवळ एक बाजू मांडल्याने येत्या काळात महसूल तूट आढळून येईल, असाही इशारा फडणवीस यांनी दिला.आमच्या कार्यकाळात कर्जाचा बोझा 60 टक्के होता तर त्याआधीच्या सरकारच्या काळात 63 % टक्के कर्ज होते या वरूनच आमच्या सरकारचे काम दिसून येते, मात्र आता च्या अर्थसंकल्पानुसार, तुटीचा संकल्प आहे असे म्हणता येईल असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.Maharashtra Budget 2020-21 Live Updates: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बजेटवर टीका करताना सर्वात आधी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ हे या भागांचा सरकारला विसर पडल्याचे म्हंटले आहे शिवाय ज्या घसोहना केल्या आहेत त्यातही अनेक त्रुटी आहेत त्यामुळे एकूणच अनेकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले केले आहे असेही फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी निर्णय घेताना अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक नवा पैसा दिलेला नाही ही बाब फडणवीस यांनी लक्षात आणून दिली. दुसरीकडे, ठाकरे सरकारने 10 लाख तरुणांना रोजगार देणार अशी घोषणा केली मात्र यात केवळ अप्रेन्टिस म्हणजेच 11 महिन्यांच्या रोजगारी प्रशिक्षणाची तरतूद आहे यानंतर रोजगारीची जबाबदारी सरकार उचलणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात अधिकांश घोषणा या केंद्र सरकारच्या जीवावर करण्यात आल्या आहेत मग ते सौरपंप पुरवठा असो वा रस्ते विकास. अगोदरच केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला दिलेल्या सौर पंपांमधून महाराष्ट्राचा वाटतं मिळाला की तीच उपकरणे आपल्या योजनेच्या नावाखाली खपवण्यात येणार आहेत. तसेच रस्ते विकासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले आहे अशा वेळी सरकारचे कर्तृत्व काय? आणि असे असूनही त्यांनी केंद्र सरकारला दूषणे लावत भाषणाची सुरुवात केली यावर नाराजी व्यक्त करतो असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आमदारांचा निधी वाढवून देणे, महिला सुरक्षेसाठी घेतलेले निर्णय, पुणे रिंग रोड, शेतकऱ्यांची कर्जमाफी या बाबींचे फडणवीस यांनी कौतुक सुद्धा केले आहे.