औरंगाबाद येथे आज नवे 57 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 958 वर पोहचला
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे वारंवार सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश राज्य ही कोरोनाच्या विखळ्यात अडकली असून त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही ठोस औषध नसल्याने डॉक्टरांकडून रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता औरंगाबाद येथे आज नवे 57 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 958 वर पोहचला आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहून राज्य सरकार त्याच्या विरोधात लढण्यासाठी वेळोवेळी पावले उचलत आहेत. तसेच राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाबाधितांची कोविड सेंटर्स आणि आयसोलेशन वॉर्ड यांची उभारणी केली जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.(Coronavirus In Maharashtra: तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)

दरम्यान, पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीत आपले कर्तव्य अहोरात्र बजावत आहेत. परंतु आता त्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे 55 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील पोलीस दलातील कर्मचारी कोरोनाच्या परिस्थितीत काम करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. तर लॉकडाउनमुळे विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे. या स्थलांतरित कामगारांचे हातावर पोट असल्याने कोणतेच उत्पादनाचे साधन लॉकडाउनच्या काळात उपलब्ध नसल्याने त्यांनी घराची वाट पकडली आहे. काही जण चक्क पायी चालत जात असल्याचे येत आहे. स्थलांतरित कामगार मिळेल त्या मार्गाने आपल्या घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.