महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: औरंगाबाद येथे AIMIM विरोधात शिवसेनेला स्विकाराव्या लागलेल्या पराभवाची चुक सुधारण्याची हिच योग्य वेळ - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray। (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक (Assembly Elections) पार पडणार आहे. याच परिस्थितीत राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. तर शिवसेना (Shiv Sena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी असे म्हटले की, त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रात भाजप (BJP) प्रणित सरकार कधीही अस्थिर केले नाही आणि राज्यात नेहमीत महत्वाची भुमिका पार पाडली आहे. शिवसेनेचा गेल्या सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद (Aurangabad) लोकसभा मतदारसंघात एआयएमआयएम (AIMIM) विरोधात पराभव झाला होता. मात्र यंदाच्या विधानसभेत या मतदारसंघातून झालेली चुक सुधारण्याची हिच योग्य वेळ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांनी असे ही म्हटले की, जेव्हा भाजप-शिवसेना महायुती झाली त्यावेळी देशभरात लोकसभा निवडणूकीत बहुमताने विजय झाला होता. पण औरंगाबाद येथून पराभव स्विकारावा लागला होता. कारण येथील लोकांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या उमेदवाराला मत दिले नाही. परंतु आम्ही एकच निवडणूक हरलो असलो तरीही येथे शेवट होणार नाही. त्यामुळे आता औरंगाबाद येथील मतदार संघात यावेळी निवडणून येणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच एआयएमआयएमचा पराभव निश्चित होईल अशी आशा ही ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणार्‍या '4' जणांची भाजपा कडून हाकालपट्टी)

एका सभेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेने राज्यातील विकास कामांसाठी महत्वाची भुमिका पार पाडल्याचे म्हटले होते. तसेच शिवसेनेचे संस्थापर अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बाबत विचार मांडला होता. सध्या नितिन गडकरी यांनी ही योजना पूर्ण केली आहे. एवढेच नाही समृद्धी महामार्गाच्या कामाकडे शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे आपले प्रयत्न पूर्णपणे करत आहेत. तर मोदी सरकारने जम्मू-कश्मीर बाबत घेतलेल्या निर्णयानंतर आता आम्ही समान नागरिक कायदा आणि बांग्लादेशातील घुसखोरी विरोधात कारवाई कधी केली जाणार याची वाट पाहत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.