आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पहाण्याची संजय राऊत यांनी व्यक्त केली इच्छा
Sanjay Raut (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या निकालासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमीवर वरळी (Worli) मतदार संघातील उमेदवार आणि शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) 7 हजार मतांनी आघााडीवर असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर ताज्या अपडेट्सनुसार शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या विधानसभा निकालाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तसेच आम्हाला हरवणे मुश्किल असून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर पहायची इच्छा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी भाजप-शिवसेनेने महायुती केली. तर मतमोजणीच्या आकड्यांनुसार एनडीए 68 जागांनी आघाडीवर असून 38 जागांवर युपीए आणि अन्य 6 जागांवर आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अद्याप मतमोजणी सुरु असून कोणाचा विजय होणार याची उत्सुकता आता अवघ्या देशाला लागून राहिली आहे. खासकरुन महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आतापासूनच कार्यकर्त्यांमधून उत्साह दिसून येत असून विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी आता शिवसेनेकडून करण्यात येत आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिछाडीवर)

दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात 288 जागांवर भाजपने 164 जागा आणि शिवसेनेने 288 जागांवर निवडणूक लढवली. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी अमुक्रमे 147-124 जागांवर निवडणूक लढवली. मात्र आता उद्या निवडणूकीचे निकाल सष्ट होणार असून कोणाची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.