Maharashtra Assembly Elections 2019: नारायण राणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप आमने-सामने
Shivsena | (Photo courtesy: archived, edited images)

महाराष्ट्रात येत्या 21 तारखेला पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी भाजप-शिवसेना पक्षाने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोकण मधील सिंधुदुर्ग (Sindhudurg)  या ठिकाणी भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) आमने-सामने दिसून येणार आहे. कारण भाजप पक्षाने येथील कमान नारायण राणे (Narayan Rane) यांच्या हातात दिल्याने शिवसेनेने येथून त्यांच्या ही उमेदवाराला तिकिट दिले आहे. शिवसेना पक्षाचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा विरोध केल्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना हद्दपार केले.

तर विधानसभ निवडणूकीसाठी नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला. तर कणकवली मतदार संघातून नितेश राणे लढणार आहे. या कारणामुळे सिंधूदुर्गात राणे यांच्या विरोधात शिवसेनने नवा उमेदवार रिंगणात उतरवला. तर शिवसेनेकडून सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांचा पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीचा वैतागूव सावंत यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच सावंत यांचा कणकवलीमधील ग्रामीण भागात दबदबा असून त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक ही आहेत. एवढेच नाही तर सावंत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सुद्धा पदाचा त्याग केला होता.(रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: दापोली ते राजापूर चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या)

नितेश राणे यांना कणवली येथून उमेदवारी देण्यात यावी अशी नारायण राणे यांची इच्छा होती. तर नारायण राणे यांची ही इच्छा पूर्ण झाली असून अखेर त्यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी भाजपकडून दिली आहे. नितेश राणे यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीवेळी काँग्रेसकडून त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी नितेश राणे यांनी भाजप आमदार प्रमोद जठार यांना हरवत विजय मिळवला होता. तर नारायण राणे यांनी स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष ही भाजपात विलिन करणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र फक्त नितेश राणे यांचाच भाजपात प्रवेश केला आहे.