India's Innovation Index 2021: भारताच्या इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये स्थान मिळविणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश
India's Innovation Index 2021 (संग्रहित संपादित प्रतिमा)

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नाविन्य (Innovation) निर्देशांक 2021 मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र 16.6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. नीती आयोगामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते ‘भारतीय नावीन्य निर्देशांक 2021’ (India Innovation Index 2021) प्रसिद्ध झाला. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के सारस्वत, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर, वरिष्ठ सल्लागार नीरज सिन्हा आणि  इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेसचे अध्यक्ष डॉ अमित कपूर उपस्थित होते.

‘मुख्य शहरांच्या’ श्रेणीत कर्नाटकाचा प्रथम क्रमांक असून यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. ‘ईशान्य आणि डोंगरी प्रदेशातील राज्ये’ या श्रेणीत मणिपूर सर्वात वरच्या क्रमांकावर आहे तर ‘केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्ये’ या श्रेणीत चंडीगढ अग्रस्थानी आहे. महाराष्ट्र हे एक महत्वपूर्ण राज्य असून काही स्तंभात राज्याने चांगले प्रदर्शन केले आहे, तर काही स्तंभात सूधारणेची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

राज्याने डीटीएफ (distance from the frontier) मध्ये सुमारे 20 युनिट्सची सुधारणा झाली आहे. राज्याने माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान (ICT) प्रयोगशाळेच्या टक्केवारीत 44% हून 71% वर झेप घेतली आहे. उच्च शिक्षणात, नावनोंदणी  पीएच.डी. 7 (प्रति लाख लोकसंख्येच्या) वरून 10 (प्रति लाख लोकसंख्येच्या) पर्यंत वाढ केली असल्याचे अहवालात नमूद आहे. (हेही वाचा:  गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

महाराष्ट्राला 16.06  हा गुणांक विविध स्तंभातील  कामगिरीच्या आधारावर काढण्यात आलेला आहे. सक्षमीकरण (ENABLERS) स्तंभात महाराष्ट्राला 19.97 गुण प्राप्त झाले आहेत. कार्य प्रदर्शन (Performers) या स्तंभात राज्याला 12.16 गुण मिळाले आहेत. मानवी भांडवल (Human Capital) या स्तंभात 25.75 गुण, व्यवसाय अनुकूल वातावरण (Business Environment) या स्तंभात 34.86 गुण, गुंतवणूक (Investment) या स्तंभात 6.76, कुशल ज्ञानी कामगार (Knowledge Workers) या स्तंभात 7.49 गुण, सुरक्ष‍ितता आणि कायद्यावर आधारित (Safety and Legal Environment) स्तंभात 25 गुण, ज्ञानावर आधारित उत्पादकता (Knowledge) Output ) या स्तंभात राज्याला 17.55 गुण आणि ज्ञानाचा प्रसार (knowledge Diffusion) या स्तंभात 6.76 गुण मिळालेले असल्याचे नोंदविण्यात आलेले आहे. वरील उल्लेखीत स्तंभाचे आणखी  उपस्तंभांचा समावेशही या अहवालात आहे.