BMC: मास्क न घालणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची धडक कारवाई; एका दिवसात 16,154 जणांकडून आकरला दंड
The BrihanMumbai Municipal Corporation (BMC) (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका (BMC) कठोर पावले उचलताना दिसत आहे. नुकतीच महापालिकेने कोरोनाची नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. त्यानुसार, मुंबईतील 1 हजार 305 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मुंबई आज एका दिवसात तब्बल 16 हजार 14 जणांकडून दंड आकरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात येत असल्याचे चिन्ह निर्माण झाले असताना पुन्हा एकदा शहरातील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबई आज 921 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, 4 मृत्युची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 19 हजार 128 वर पोहचली आहे. यापैकी 2 लाख 99 हजार 546 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 11 हजार 442 जणांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- नगरसेवकांना 1 मार्चपासून कोविड-19 लस मिळणार; महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर BMC चे 'हे' स्पष्टीकरण

एएनआयचे ट्विट-

महाराष्ट्रात आज 6 हजार 971 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज नवीन 2 हजार 417 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 19 लाख 94 हजार 947 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52 हजार 956 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.