पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी कौतुक केलेले नाशिकचे शेतकरी राजेंद्र जाधव यांंचे सॅनिटायझर फवारणी मशिन नेमके आहे काय? पहा व्हिडिओ
PM Modi Praises Nashik Farmer For Sanitizer Machine (Photo Credits: Twitter/ PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज दर महिन्याप्रमाणे मन की बात (Maan Ki Baat)  या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी कोरोनाच्या (Fight Against Coronavirus)  लढ्यात स्थानिक पातळीवर लढणाऱ्या अनेक योद्ध्यांचे कौतुक केले. यामध्ये नाशिक (Nashik) च्या बागलाण (Bauglan) तालुक्यातील शेतकरी राजेंद्र जाधव (Rajendra Jadhav)  यांच्या कामाचा उल्लेख करत मोदींनी जाधव यांचे कौतुक केले. राजेंद्र यांनी आपल्या ट्रॅक्टरला सॅनिटायझर फवारणी करणारे मशीन (Sanitizer Spray Machine)  बसवून याद्वारे संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी केली होती. या अनोख्या संकल्पनेसाठी राजेंद्र यांना मोदींकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. Mann Ki Baat, May 31, 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे स्ट्रीमिंग इथे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी कौतुक केल्याचे समजताच राजेंद्र जाधव यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे, याबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हंटले की, "कोरोनाचं संकट असताना आपणही सर्वांना मदत होईल असं काहीतरी करावंं अशी इच्छा होती, अगदी मोजक्या साधनात ही मशीन बनवण्यात आली आहे. मात्र याचा फायदा कमालीचा आहे".

राजेंद्र जाधव यांची सॅनिटायझर फवारणी करणारी मशीन पहा

मन की बात दरम्यान मोदींनी राजेंद्र जाधव यांच्या समवेत अन्यही अनेक जणांचा उल्लेख केला, मुलीच्या शिक्षणासाठी जमा केलेले 5 लाख रुपये गरिब आणि होतकरु नागरिकांसाठी खर्च करणारे सी, मोहन हे तामिळनाडूचे रहिवासी तसेच 3 हजार मास्कचे वाटप करणारा पंजाब मधील दिव्यांग मुलगा राजू तसेच देशभरात विविध ठिकाणी राबवण्यात येणारे अन्नछत्र या सर्वांचा मोदींनी उल्लेख करत त्यांचेही खूप कौतुक केले आहे.

दरम्यान, सेवा परमो धर्म ही भारताची शिकवण आहे, याच भावनेतून आज सर्व स्तरावर कोरोनाशी लढताना आपल्या प्रत्येक जण एकमेकांची मदत करत आहे. भारताची लोकसंख्या कोट्यवधी असूनही हा मदतीचा भाव आणि नागरिकांचे ध्येय इतके आहे की जगाच्या तुलनेत भारतात अजूनही कोरोनाचा नियंत्रणाबाहेर प्रसार झालेला नाही. हे कोट्यवधी भारतीयांचे यश आहे. अशा शब्दात मोदींनी आज देशवासियांचे कौतुक केले.