Lockdown In Navi Mumbai: नवी मुंबई येथील कंटनमेंट झोनसाठी 8 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) येथील काही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.

Lockdown (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) थैमान घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) येथील काही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतील कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी 29 जून ते 5 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापलिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त मिसाळ यांनी कंटेनमेंट झोनची यादी आणि निर्बंध जाहीर केले आहेत. कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी असणार आहे. कंटेनमेंट झोन असणाऱ्या या ठिकाणी तसेच त्याच्याबाहेर लोकांनी संचार तसेच प्रवास करु नये यासाठी कठोरपणे नियमाची अमलबजावणी करावी असे सांगण्यात आले आहे. वैद्यकीय आणीबाणी तसेच अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा यांना यामधून सूट असणार आहे. हे देखील वाचा- COVID19 Updates In Maharashtra: महाराष्ट्रात आजपर्यंतची सर्वाधिक 5 हजार 24 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 175 जणांचा मृत्यू

ट्वीट-

कंटनमेंट झोनमध्ये आरोग्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन केले जावे, असे आदेशात नमूद आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बेलापूरमधील दिवाळे आणि कराळे गाव, तुर्भे येथील तुर्भे स्टोअर्स आणि तुर्भे गाव, वाशीमधील जुहू गाव सेक्टर 11, कोपरखैराणे येथे 12 खैराणे आणि बोनकोडे, घणसलोतील रबाळे गाव आणि ऐरोली येथील चिंचपाडा कंटनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif