Lockdown in Beed: बीड जिल्ह्यात 26 मार्च ते येत्या 4 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन; पहा काय सुरु, बंद राहणार
Coronavirus lockdown | Representational Image (Photo Credits: IANS)

Lockdown in Beed: राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे बीडमध्ये संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले गेले आहेत. तर अशातच आता येत्या 26 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. हा लॉकडाऊन 26 मार्चला रात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहे. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. त्याचसोबत दूध, फळ आणि भाज्यांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर देशात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत.(COVID19 मुळे होळी साजरी करण्यासंदर्भात लागू करण्यात आलेल्या निर्बंधावर राम कदम यांची सरकारवर टीका)

कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे वळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तरीही सुद्धा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. परंतु काही ठिकाणी आता लॉकडाऊन ही जाहीर करण्यात आला आहे. अशातच आता बीड जिल्ह्यात सुद्धा लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने कोणत्या गोष्टी सुरु असणार किंवा कोणत्या बंदअसणार त्या बद्दल येथे अधिक जाणून घ्या.(BMC Guidelines for Holi 2021: यंदा मुंबईत धुलिवंदन नाही! कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी बीएमसीने जारी केले आदेश) 

Tweet:

दरम्यान, सर्वत्र सध्या कोरोनाच्या लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. तर 60 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जात असून चाचण्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे. अशातच गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 28,699 रुग्ण आढळले आहे. तर 132 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 25,33,026 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 22,47,495 जणांनी कोरोनावर मात केली असून एकूण 53,589 जणांचा मृत्यू झाला आहे.