Lockdown: महाराष्ट्रात आतापर्यंत कलम 188 अंतर्गत एकूण 1 लाख 21 हजार 75 गुन्ह्यांची नोंद; तर, 23 हजार 641 जणांना अटक
प्रतिनिधी हेतूसाठी वापरलेली प्रतिमा  | (Photo Credits: Unsplash)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या (Lockdown) काळात प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन आहेत. यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान,लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत कलम 188 अंतर्गत एकूण 1 लाख 21 हजार 75 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 23 हजार 641 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहेत. मात्र काही नागरिक अत्यावश्यक साहित्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. एवढेच नव्हेतर, काही नागरिकांच्या गैरजबाबदारीपणामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत कलम 188 अंतर्गत 1 लाख 21 हजार 75 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 23 हजार 641 जणांना अटक करण्यात आली आहे. यात अवैध वाहतूक करणाऱ्याचाही समावेश आहे. तसेच या कालावधीत नागरिकांकडून 6 कोटी 11 लाख 93 हजार 848 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. हे देखील वाचा-सांगली: मुंबई येथून मिरजेत विनापरवानसह येऊन माहिती लपवल्याप्रकरणी कोरोनाबाधित व्यक्तीसह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल

अनिल देशमुख यांचे ट्वीट-

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. सतत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ असताना अनेकजण लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समजत आहे. अशा नागरिकांच्या विरोधात प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.