Lockdown: महाराष्ट्रात 38 लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त; गेल्या 24 तासात 155 गुन्हे दाखल
Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

कोरोना विषाणू (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यात (Maharashtra) सुरुवातीला जमावबंदी कायदा लागू करण्यात आला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी (Lockdown) लागू केली आहे. दरम्यान, केवळ अत्यावश्यक साहित्यांच्या विक्रीस परवानगी दिली जाते. मात्र, संपूर्ण देशात संचारबंदी असताना अवैद्यरित्या दारूची विक्री केली जात असल्याचे समजत आहे. यातच महाराष्ट्रात आज महाराष्ट्र् राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Maharashtra State Excise Department) तब्बल लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी 155 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले असतानाही बेकायदा मद्य वाहतूक व विक्री सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आले आहे. या काळात मद्यसाठा वाहतूक व विक्रीस मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे तळीरामांची मागणी वाढली आहे. त्यासाठी ते वाटेल ती किंमत दयायला तयार असल्याने मद्यविक्रेत्यांनी बेकायदा पुढाकार घेतला आहे. यातच संपूर्ण भारतात संचारबंदी असताना महाराष्ट्रात आज 38 लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने 155 गुन्हे दाखल करण्यात आले असून 155 जणांना अटक झाल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. हे देखील वाचा- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; केशरी शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार 'ही' सुविधा

एएनआयचे ट्वीट-

संचारबंदीत दारुची विक्री करता येत नसल्याने विरार येथील एका बार मालकाने अनोखी शक्कल लढवली होती. यासाठी त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ऑनलाईन दारू विक्रीची सुरुवात केली होती. मात्र, स्थानिक पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी बनावट ग्राहकाचा सापळा रचून संबंधित बार मालकाला ताब्यात घेतले होते.