धुळे येथे पाण्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याचा 3 जणांवर हल्ला, जखमींवर उपचार सुरु
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

धुळे (Dhule) येथे पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला आहे. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच गावातील मंडळींनी या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे.

तर धुळ्यात शासनाकडून पाणी योजनेसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहे. तरीही गावातील तळे आणि नद्या आटण्याच्या मार्गावर आहेत. यामुळेच वन्यजीवन जंगलातून बाहेर पडून गावाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तरीही बिबट्याने जंगलाच्या बाहेर येऊन गावातील तीन जणांवर हल्ला केला आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तर शेतातसुद्धा पाऊल ठेवण्यासाठी ग्रामस्थ घाबरत आहेत. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी गावातील मंडळींकडून केली जात आहे.