Mumbai Pune Expressway Representative (Photo Credits: Facebook)

Landslide: मुंबई पुणे हायवेवर (Mumbai Pune Express Way) दरड कोसळल्याचे पर्व सुरुच आहे. काल रात्री 9च्या सुमारास पुन्हा एकदा दगज कोसळल्याची घटना घडली. 23 जुलै रोजी मुंबई पुणे हायवेवरिल आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. दरम्यान गुरुवारी धोकादायक दरडी काढण्यासाठी मुंबई वाहिनी दोन तास बंद ठेवण्यात आली होती. मात्र, काल रात्री कामशेत बोगद्या जवळ दरड कोसळली त्यामुळे पुन्हा वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही. वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई कडे जाणारे वाहतुकींना अडचणींना सामना करावा लागतो.

राज्यात प्रचंड पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाले. कामशेतचा बोगदा संपल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर ही दरड कोसळली आहे. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर दुपारच्या सुमारास मुंबईकडे जाणारा रस्ता सुरू करण्यात आला होता. सलग दोन दिवस येथील धोकादायक दरडी कोसळल्याची घटना घडली. लवकरच यावर उपाय म्हणून जाळे बसवण्यात येईल. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर दुपारी अडीच नंतर मुंबई मार्ग सुरु करण्यात आला अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

मुसळधार पावसामुळे कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे रस्तावरील माती आणि दगड बाजूला करण्याचे काम चालू आहे. मुसळधार पावसाने ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे तीन चार दिवसांपासून या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडत आहे. दुपार पर्यंत या रस्त्यावरिल दरड काढण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.  गुरुवारच्या रात्री ही घटना घडली आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.