कोल्हापूर: लष्करी जवानाच्या पत्नीची 2 मुलांसह आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

जवानाच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार कोल्हापूर (Kolhapur) येथून समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरातील शाहुवाडी तालुक्यात नेर्ले गावात ही घटना घडली. घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले.   (सोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या)

न्युज 18 नेटवर्कने दिलेल्या वृत्तानुसार,  स्वाती पाटील असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून विभावरी आणि देवांश अशी मृत मुलांची नावे आहेत. (पोटच्या मुलीवरच वडिलांचा बलात्कार, पीडित मुलीने केली आत्महत्या)

लष्करी सेवेत असणाऱ्या महेश पाटील यांच्याशी स्वाती हिचा 2012 मध्ये विवाह झाला होता. महेश यांची सध्या राजस्थानमध्ये पोस्टींग आहे. गुरुवारी सकाळच्या वेळेस घरात कोणी नसताना अंगावर रॉकेल ओतून घेत स्वातीने पेटवून दिलं. त्यावेळी दोन्ही मुलांनी तिला मिठी मारली. यामध्ये स्वातीसह दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.