महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले ते शाहूवाडी मतदार संघाचे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या
Maharashtra Assembly Elections 2019 | File Image

Maharashtra Assembly Elections 2019: कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 10मतदार संघ आहेत. 2014 विधानसभा निवडणुकीत 6 जागा शिवसेनेकडे, 2 भाजपकडे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसमुक्त झाला. कोल्हापूर महापालिका व्यतिरिक्त सर्वच ठिकाणी शिवसेना-भाजपच्या युतीने सत्ता स्थापन केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप-सेनेची सत्ता असल्याचा पूर्ण फायदा घेतला जात आहे. त्यामुळे एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीची सरकार असलेल्या कोल्हापूर शहरात या दोन्ही पक्षांना तगडा उमेदवार सापडेनासा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत पुनरागमन केल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे.

कोल्हापूर उत्तर मतदार संघ

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या विधानसभा मतदार संघाच्या इतिहासाबद्दल बोलले तर इथे दोनदा निवडणुका घेण्यात आल्या आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय सदाशिवराव मंडलिक यांनी 2 लाख 70 हजार 568 मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवरून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर 69 हजार 736 मतांनी विजयी झाले होते. ही जागा शिवसेनेचा प्रभाव क्षेत्र आहे. मागील दोन्ही निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. 2009 आणि 2019 मध्ये शिवसेनेने राजेश विनायकराव यांना उमेदवारी दिली होती आणि विनायकराव यांनी निराश न करता दोन्ही वेळा विजयी मिळवला होता.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

अजय कुरणे, बीएसपी

चंद्रकांत पंडित जाधव, काँग्रेस

राजेश विनायक क्षीरसागर, शिवसेना

सतीशचंद्र बाळकृष्ण कांबळे, सीपीआय

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

राजेश विनायकराव क्षीरसागर (शिवसेना) - 69736

कदम सत्यजित शिवाजीराव (कॉंग्रेस) - 47315

महेश बाळासाहेब जाधव (भाजप) - 40104

शाहूवाडी मतदारसंघ

शाहूवाडी, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतो. इतिहासाच्या दृष्टीकोनातून हे क्षेत्र देखील महत्त्वाचे आहे आणि बर्‍याच खाणींनीही हा परिसर विशेष बनविला आहे. जर आपण 1962 पासून चर्चा केली तर प्रथमच येथे कॉंग्रेस जिंकली, पी़ब्ल्यूपी 1967 मध्ये तर 1972, 1978, 1980 मध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. त्यानंतर 1985 मध्ये शाहूवाडीच्या लोकांनी अपक्षांना, 1990 मध्ये शिवसेना, 1995 मध्ये अपक्ष, 1999 मध्ये कॉंग्रेस, 2004 मध्ये शिवसेनेला, तर नंतर 2009 मध्ये जेएसएसच्या उमेदवाराला संधी दिली. सत्यजित बाबासाहेब पाटील-सरुडकर हे शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

सत्यजित बाबासाहेब पाटील, शिवसेना – 74,702

विनय कोरे, जनसुराज्य – 74,314

अमरसिंह पाटील, स्वा. शेतकरी संघटना – 27,953

कर्णसिंग गायकवाड, काँग्रेस – 21,443

बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस – 4,671

शाहूवाडी विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

हातकणंगले मतदार संघ

कोल्हापूर क्षेत्रातील हे क्षेत्र निरंतर प्रगती करीत असून आता कृषी क्षेत्रात बरीच प्रगती होत आहे. शिवाय, शिक्षणाच्या क्षेत्रातही सातत्याने विकास होत असून यामध्ये शाळा आणि महाविद्यालये बांधण्याचेही कामदेखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. 1962 ते 1972 पर्यंत येथे कॉंग्रेसचे राज्य होते आणि कॉंग्रेस नेहमीच चांगल्या फरकाने मिळवला होता. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे राज्य आले. आणि 2014 मध्येदेखील शिवसेनेचे मंत्री सुजित वसंतराव यांनी कॉंग्रेसचे आमदार जयंत गंगाराम यांचा पराभव केला आणि ही विधानसभा जागा जिंकवून आणली.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

मिंचेकर सुजित वसंतराव (शिवसेना) - 89,087

जयंत गंगाराम (कॉंग्रेस) - 59,717

राजू किसनराव (जेएसएस) - 37,874

हठकाणंगले विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

राजू जयवंतराव आवळे, काँग्रेस

चंद्रशेखर सदाशिव कांबळे, बीएसपी

सुजितकुमार वसंतराव मिंचेकर, शिवसेना

अशोक कोंदीराम माने, व्हीएसपीआय

शिवाजी परसू कांबळे, अपक्ष

इचलकरंजी मतदार संघ

इचलकरंजी विधानसभा मतदार संघ कापड आणि वस्त्र उत्पादनाच्या उद्योगासाठी ओळखला जातो आणि महाराष्ट्रातील या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हटले जाते. आता इचलकरंजी सतत विस्तारत होत आहे. तथापि, खारट पाणी ही आजही येथील मुख्य समस्या आहे. 2004 पर्यंत कॉंग्रेस आणि सीपीएमने बर्‍याच काळ राज्य केले. पण, 2004 मध्ये भाजपने या बालेकिल्ल्यात प्रवेश केला आणि 2014 मध्येही विजय मिळविला. 2014 मध्ये भाजपाचे सुरेश गणपती हलवणकर यांनी कॉंग्रेसचे उमेदवार प्रकाश अवधे कलप्पा यांचा पराभव करून पुन्हा विजय मिळविला. यापूर्वी 2009 मध्येदेखील त्यांनी विजय मिळवला होता.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

सुरेश गणपती हलवणकर (भाजप) - 94,214

प्रकाश अवधे कलप्पा (कॉंग्रेस) - 79,038

मदन सीताराम (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) –14,797

इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

उमेश बाजीराव खांडेकर, बीएसपी

राहुल खंजिरे, काँग्रेस

सुरेश गणपती हलवणकर, भाजप

शशिकांतआमणे, अपक्ष

शिरोळ मतदार संघ

शिरोळ विधानसभा जागा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पण, 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र शामगोंडा यांचा पराभव करून त्यांचा विजय रथ थांबविला. राज्याच्या राजकारणातच नव्हे तर इतिहासाच्या पानांमध्येही शिरोळला महत्त्वाचे स्थान दिले आहेत. त्याचे नाव शिरोळ ठेवण्यामागे एक खास कथा आहे आणि हा शब्द शीर आणि ओळपासून बनविला गेला आहे. यापूर्वी कॉंग्रेसने 1962  ते 1980 या काळात, पीडब्ल्यूपीने 1980 मध्ये, कॉंग्रेसने 1999 पर्यंत पुन्हा, तर अपक्षांनीनंतर एकदा आणि काँग्रेसने दोनदा विजय मिळविला होता. पण, 2014 मध्ये काँग्रेस त्यांची जागा वाचवू शकली नाही.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

उल्हास संभाजी पाटील (शिवसेना) - 70,809

राजेंद्र शामगोंडा (राष्ट्रवादी) - 50,776

सावरकर मदनायक (सोशलिस्ट वर्क्स पार्टी) 48,511

शिरोळ विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

आदम बाबू मुजावर, बीएसपी

उल्हास पाटील, शिवसेना

अनिल उर्फ सावकार बाळू मदनाईक, एसडब्ल्यूपी

अनिल कुमार यादव, जेएसपीआय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकी 2019 मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत पुनरागमन केल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे.