Kangana Ranaut Y+ Security Controversy: कंगना रनौत ची तुलना झाशीच्या राणीशी करणार्या 'झाशीचा राजा' राम कदम यांनी जनतेची माफी मागावी- सचिन सावंत
Kangana Ranaut Y+ Security Controversy: बॉलिवूड मधील अभिनेत्री कंगना रनौत हिची भाजप आमदार राम कदम यांनी झाशीची राणी अशी उपमा दिली होती. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांकडून राम कदम यांच्यावर टीका करण्यात आली. याच दरम्यान आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सुद्धा राम कदम यांच्यावर निशाणा साधला असून राम कदम यांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीसोबत केल्याप्रकरणी देशाच्या जनतेची माफी मागावी असे स्पष्ट केले आहे. ऐवढेच नाही तर भाजपचे 'झांसे के राजा' असे राम कदम यांना संबोधण्यात आले आहे.(Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रणौतने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी विचार करील - संजय राऊत)
सचिन सावंत यांनी व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना असे ही म्हटले आहे की, मोदी सरकार आपल्या समर्थकांची, आपल्या अजेंड्यावर चालणाऱ्या आणि चालवणाऱ्यांची अत्यंत काळजी घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच दरम्यान आता कंगना हिला Y दर्जाची सुरक्षा दिल्याबद्दल आश्चर्य वाटण्याची गरज नाही. तसेच कंगना हिने आपल्याकडे ड्रग्जच्या माफिया कनेक्शन आणि बॉलिवूड संदर्भातील मोठी माहिती असल्याचे म्हटले होते. परंतु यामध्ये मुंबई पोलीस यामध्ये कोणतीही चौकशी करत नाहीत. मात्र ड्रग्ज प्रकरणाची चौकशी तर एनसीबी करत असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुद्धा त्यांच्याकडे असलेली माहिती एनसीबीला देऊ त्यांच्या कार्याला मदत करावी अशी अपेक्षा होती असे ही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
परंतु कंगनाचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत त्यात ती स्वत: ड्रग्ज अॅडिक्टेड असल्याचे कबूल केले आहे. तिच्या पूर्वीच्या साथीदारांना सुद्धा ती हे ड्रग्ज घेण्यास भाग पाडायची असे ही सावंत यांनी सांगितले. हे सगळे व्हिडिओ समोर येता आणि पाहता राष्ट्रवादीने स्वत: जाऊत याचा तपास करावा असे स्पष्ट केले आहे. (Kangana Ranaut to Get Y Level Security: अभिनेत्री कंगना रनौत ला केंद्र सरकार कडून 'Y' दर्जाची सुरक्षा; ट्वीट करत मानले अमित शाह यांचे आभार)
दरम्यान, कंगना रनौत हिने काही दिवसांपूर्वी मुंबईची पाकव्याप्त कश्मीर सोबत तुलना केल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना पक्षाने देखील कंगनाचं थोबाड फोडल्याशिवय राहणार नाही अशाप्रकारची वक्तव्य केली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीकडून देखील पोस्टर्स फाडण्यात आली. त्यानंतर आता 9 सप्टेंबरला मुंबईत येणार्या कंगनाला केंद्र सरकारकडून 'Y' दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल अशी सुत्रांची माहिती आहे अशाप्रकारचे ट्वीट ANI कडून करण्यात आले आहे.