कल्याण: चायनीज दुकानात स्फोट; अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
स्फोट (Archived, edited, representative images)

Kalyan Fire At Chinese Centre: चायजनीज दुकानात स्फोट होऊन लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री कल्याण येथे रात्री एकच्या सुमारास घडली. स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि काही जवान घटनास्थळी पोहोचले होते. याच घटनेत आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. कल्याण परिसरातील गोल्डन पार्क येथे असलेल्या चायनीज दुकानात स्फोट झाला.

प्राप्त माहितीनुसार, अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, चायनिज दुकाणात असलेल्या दुसऱ्याही सिलिंडरचा स्पोट झाला. या स्फोटामुळे आग भडकली. यात जगन आमले यांचा मृत्यू झाला. अचानक झालेला स्फोट आणि त्यामुळे लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्णाण झाले. रात्रीची वेळ असल्यामुळे अनेक लोकांना आगीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते गोंधळून गेले. दरम्यान, सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही काळासाठी परीसरातील विजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता. (हेही वाचा, पाकिस्तान: हंगू मध्ये स्फोट, 25 जणांचा मृत्यू, 30 जखमी)

दरम्यान, याच महिन्यात नेतीवली येथील लोकक्रागम येथे सफाईसाठी विहिरीत उतरलेले तिघे बुडाले होते. या तिघांचा शोध घेण्यासाठी कल्याण डोंबिववली अग्निशमन दलाचे जावान विहिरीत उतरले होते. या वेळीही अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा घटनांमध्ये जवानाचा मृत्यू होण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.