Kalyan: प्रेमप्रकरणावरुन दोघांत राडा, धडक देत व्यक्तीला चढवले बोनेटवर
Representative Image (Photo Credits: File Photo)

Kalyan: कल्याण येथे दोन व्यक्तींमध्ये प्रेमप्रकरणावरुन राडा झाल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी आधारवाडी चौक येथे घडल्याची माहिती दिली आहे. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या प्रवीण चौधरी हा एका मित्राला भेटण्यासाठी कल्याण येथे आला होता.(Mumbai Police: वाहनावरील चलन 12 मार्च पर्यंत न भरल्यास न्यायालयात खटला दाखल होणार, मुंबई पोलिसांचा वाहनचालकांना इशारा)

त्रिवेश असे मित्राचे नाव असून त्यांच्यामध्ये वाद होतो आणि प्रवीणला तो चौकाजवळ थांबवण्याचा प्रयत्न करतो. हा सर्व प्रकार स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर ही घटना सोशल मीडियात व्हायरल झाला. व्हिडिओत असे दिसून आले की,त्रिवेश हा प्रवीणच्या कारसमोर उभा आहे. गाडी थांबवण्याऐवजी प्रवीणने ती कार त्रिवेशच्या अंगावर चढली. प्रवीणने काही अंतरापर्यंत ही कार चालवली आणि त्रिवेश गाडीच्या बोनेटवरुन खाली पडला. त्यानंतर प्रवीणने तेथून पळ काढला.(Pune: लग्नानंतर पत्नीचे लग्न झाल्याचे पतीला समजले, उचलले धक्कादायक पाऊल)

दरम्यान, या घटनेप्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांनी प्रवीणच्या विरोधात खडकपाडा पोलिस स्थानकात कारवाई केली. तसेच ही घटना नेमकी कुढे घडली याची नोंद करण्यात आलेली नाही.