जोगेश्वरी: महिलेचा चोरीछुप्या अंघोळीचा व्हिडिओ शूट केल्याने टॅक्सी चालकाला अटक
Obscene Video

जोगेश्वरी (Jogeshwari) येथे राहणाऱ्या एका महिलेच्या बाथरुमध्ये चोरीछुप्या रितीने मोबाईल ठेवत तिचे चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर बाथरुममध्ये ठेवण्यात आलेल्या मोबाईलकडे महिलेचे लक्ष गेल्यास तिने तातडीने त्याबद्दल पोलिसात धाव घेतली.

महिला बाथरुममध्ये अंघोळ करत असताना छप्पर आणि भितींच्या गॅपमध्ये मोबाईल ठेवला असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यावेळी महिलेने फोन त्या ठिकाणाहून काढत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. यावरुन पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच ज्या ठिकाणी मोबाईल ठेवला होता तेथे सुद्ध पोलिसांनी तपासणी केली.

(अकोला: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले)

तपासणी केल्यानंतर पोलिसांना शेजाऱ्याची खोली आणि बाथरुम यामध्ये एक भिंत असल्याचे दिसले. त्यावरुन पोलिसांनी शेजारच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. अटक केलेला व्यक्ती पेशाने टॅक्सी चालक आहे.तसेच मोबाईल फॉरेन्सिक लॅबममध्ये पाठवण्यात आला आहे.