Jogeshwari: शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, घटनेत MNS उपाध्यक्ष जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

Jogeshwari:  जोगेश्वरी येथे नालेसफाईच्या कारणावरुन शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद हा शिगेला जाऊन पोहचला की यामध्ये मनसे उपाध्यक्ष जखमी झाला आहे. असे सांगितले जात आहे की, जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या विभाग 73 मधील ही घटना आहे.(Matheran Municipal Council: माथेरान नगरपालिकेत शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजप प्रवेश)

शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे यांच्या घराजवळ साफसफाईचे काम सुरु होते. त्यावेळी मनसेचे अध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्यासोबत पक्षाचे काही कार्यकर्ते दाखल झाले. त्यानंतर शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते दाखल झाले. या दोन्ही गटांत काही कारणास्तव वाद सुरु झाला आणि त्याचे नंतर रुपांतर हाणामारीत झाले.(सामना मधील ममतादीदींच्या 'त्या' बातमीवरुन अतुल भातखळकर यांचा संजय राऊत यांना टोला View Tweet)

या प्रकरणी पोलिसांनी माहिती देत असे म्हटले की, या दोन गटात झालेल्या हाणामारीत मनसेचे प्रवीण मर्गज हे जखमी झाले आहेत. त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. तर मनसे आणि शिवसेने मधील वाद आणखी शिगेला जाऊ नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचसोबत मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.