जळगाव: आजोंबाकडून सुन,नातीचा जातीवरुन छळ; तरुणीची गळफास लावून आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

जळगाव येथे जातीवरुन वाद निर्माण झाल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या आत्महत्ये मागील खरे कारण स्पष्ट झाले असून मुलाने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे मुलाच्या बायकोला आणि तिच्या मुलीला जातीत घेण्यास आजोबांनी नकार देत त्यांचा छळ सुरु केला होता. मात्र अखेर तरुणीने आजोबांच्या या छळाला कंटाळून गुरुवारी काकाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

आनंद बागडे यांनी एका महिलेसोबत आंतरजातीय विवाह केला होता. या महिलेपासून बागडे यांना दोन मुली झाल्या. पण बागडे यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न झाले असले तरीही अजून एका महिलेसोबत लग्न केले असता या महिलेपासून त्याला तीन मुले झाली. तर पहिल्या बायोकोला आणि तिची मुलगी मानसी हिला जातीत घेण्यासाठी त्यांनी नवऱ्याच्या वडिलांना विनंती केली. पण त्यांना अखेर जातीत घेण्यास स्पष्टपणे नकार देत त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली.(ठाणे: गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने दिली 450 उठाबश्या काढण्याची शिक्षा, गुन्हा दाखल)

तर मुलीवर जातीमधील पद्धतीने अंतिम संस्कार करण्यासाठी पंचायतीने वडिलांकडून 20 हजार रुपयांची रक्कम देण्यास सांगितले आहे. त्यानंतरच जातीच्या प्रमाणे मुलीवर अंत्यसंस्कार करावे असा निर्णय दिला आहे.