Subhash Desai Meets Jyotiraditya Scindia: उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी घेतली केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांची भेट
Subhash Desai meets Jyotiraditya Scindia

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी मंगळवारी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांची भेट घेतली. त्यांनी औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी नावाचे नामकरण तातडीने करण्याची विनंती केंद्राला केली. तसेच विमानतळाच्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी मंजुरी मागितली. मार्च 2020 मध्ये, एमव्हीए सरकारने (MVA Government) औरंगाबाद विमानतळाचे (Aurangabad Airport) छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, केंद्राकडून याला अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही. हेही वाचा Sandeep Deshpande, Santosh Dhuri यांच्यावर अटकेची तलवार कायम; जामीनावर सुनावणी 19 मे दिवशी!

यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते. देसाई यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी राज्यशासना हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या प्रस्तावास नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी मागणी देसाई यांनी यावेळी केली.