Mumbai Rain | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला असून, पुढील काही दिवसांत वेगळ्या भागात मुसळधार ते अति मुसळधार (Heavy Rainfall in Mumbai) पावसाची शक्यता असल्याचे हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तवताना म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांपर्यंत हा इशारा देण्यात आला आहे. IMD ने X (जुने ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "पुढील 3-4 तासांत मुंबई आणि लगतच्या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे." आज दुपारी 4:06 वाजता 3.87 मीटर उंच भरती येण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मुसळधार ते अति मुसळधार पाऊस

मुंबई वेदर ट्रॅकर, 'मुंबई रेन्स' ने X वर देखील भाकीत केले आहे, “नवीन अंदाजानुसार मुंबई आणि एमएमआर भागात पुढील 48 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे. कारण पाऊस कमीत कमी सतत मध्यम ते मुसळधार राहील. पुढील 24-36 तास.” दादर, वरळी आणि वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये आज सर्वाधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, मुंबई महानगर प्रदेश (MMR) च्या अंतर्गत भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Mumbai High Tide Timing Today: भरतीच्या वेळी समुद्रात 4.19 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता; बृहन्मुंबई महानगरपालिकेची माहिती)

एक्स पोस्ट

ऑरेंज अलर्ट जारी

दम्यान, IMD ने 13 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यानंतर पुढील दिवसांसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. हवामान अंदाज व्यक्त करताना या विभागाने म्हटले आहे की, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरां दमदार पावसाची तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरातील सरासरी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28°C आणि 24°C च्या आसपास असेल.

एक्स पोस्ट

IMD, मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मान्सूनचा प्रवाही आहे आणि या कालावधीत अतिवृष्टीसाठी मुंबईवर चक्रीवादळाची स्थितीही तयार झाली आहे. ज्यामुळे जोरदार पश्चिमेकडील वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे." मुंबईत अलीकडेच 7 जुलै ते 9 जुलै दरम्यान 422 मिमी पावसाची नोंद झाली असून 7 जुलै ते 8 जुलै दरम्यान अवघ्या 24 तासांत 268 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

एक्स पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौरा

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) हाती घेतलेल्या 7,470 कोटी रुपयांच्या अनेक नागरी-पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी 13 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई शहरास भेट देत आहेत. या पार्श्वभूमीवर हमामान विभागाने वर्तवलेला अंदाज महत्त्वाचा मानला जात आहे. गोरेगाव येथील NESCO केंद्रात पंतप्रधानांची सभा होणार आहे.