Maharashtra Rains: राज्यातील विविध भागात दमदार पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Heavy Rain | (Photo Credit: Archived, edited, representative images)

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार (Heavy Rain) पावसाने हजेरी लावली आहे. काल काही भागात वरुण राजा शांत असला तरी आज पुन्हा एकदा राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मध्यरात्री पासुन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्रातही (West Maharashtra) पावसाने सकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे. मराठवाडा (Marathwada)आणि विदर्भाच्या (Vidarbha) विविध जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असुन हवामान विभागाकडून येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असुन नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

 

मध्यरात्री मुंबईत (Mumbai) जोरदार पावसानं हजेरी लावली होती. सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप बघायला मिळत आहे. ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), नवी मुंबई (Navi Mumbai), पालघर (Palghar) या भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  तसेच पुणे (Pune), नाशिक (Nashik), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), बुलडाणा (Buldhana), परभणी (Parbhani), वर्धा (Wardha), नांदेड (Nanded), अकोला (Akola) या जिल्ह्यात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हे ही वाचा:- Farmer Suicide Attempt in Beed: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणावेळी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक प्रकार)

 

तर मराठवाड्यातील नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli), जालना (Jalna), औरंगाबाद (Aurangabad), लातूर (Latur), बीड (Beed) या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही अंदाज वर्तवण्यात आला आहे.