मुंबई, ठाणे परिसरात वीजेच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात
Rainfall | Image used for Representational purpose only | (Photo Credits: PTI)

मुंबई सह ठाण्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आला होता. त्यानुसार येत्या 24 तासामध्ये मुंबई, ठाणे सह पश्चिम किनार पट्टीच्या लगतच्या शहरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या (11 जून ) दिवशी देखील अशाच प्रकारे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुंबई, ठाणे परिसरात पावसाला सुरुवात

ट्विटर वर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

प्रामुख्याने मच्छीमारांनी अरबी समुद्रामध्ये न जाण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वायू चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या पावसाची शक्यता आहे. मुंबई मध्ये मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. हा वळवाचा पाऊस आहे.