सीवूड्स आणि बेलापूर स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे, वाहतूक ठप्प
मुंबई लोकल ट्रेन(Photo Credits: PTI)

चाकरमान्यांचा आठवड्याची सुरूवातच आज लेट मार्कने झाली आहे. मुंबईत ऐन गर्दीच्या वेळेस हार्बर मार्गावर सीवूड्स आणि बेलापूर स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने वाहतूक ठप्प झालीआहे. सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने ऐन गर्दीच्या वेळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

चाकरमान्यांची गौरसोय

हार्बर रेल्वे मार्गावर बिघाड झालेल्याने अनेक प्रवाशांना त्रास करावा लागत आहे. सकाळी 9.45 वाजता ही घटना घडली. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दुरूस्तीचं काम सुरू

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि गर्दीच्या वेळेस प्लॅटफॉर्मवरील वाढती गर्दी लक्षात घेता तात्काळ प्रशासनाने काम हाती घेतलं आहे. सीवूड्स आणि बेलापूर या मार्गावर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.