
हॅकर मनिष भंगाळे (Hacker Manish Bhangale ) याने पुन्हा एकदा भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना इशारा दिला आहे. 'मी अजूनही जिवंत आहे. मी पुन्हा तुमच्याकडे वळेन', अशा शब्दात हॅकर मनिष भंगाळे याने एकनाथ खडसे यांना इशारा दिला आहे. दरम्यान, आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे झालेल्या वेदना भाजप आमदार एकनाथ खडसे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर भंगाळे याने हा इशारा दिला आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना खडसे यांनी म्हटले होते की, दाऊदशी संबंध नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर माझ्या पत्नीला आणि मला हुश्श्य वाटले. पण, दाऊदच्या पत्नीला दाऊद सोडून माझ्याशी का बोलावेसे वाटले हे अद्याप कळले नाही, अशी मिश्किल टीप्पणीही खडसे यांनी केली होती. (हेही वाचा, मलाच वेगळा न्याय का? एकनाथ खडसे यांनी भाजपला खडसावले)
मनिष भंगाळे ट्विट
I will get back to you sir on this ..still I am alive....https://t.co/H3NsjeIz9w @EknathKhadseBJP
— Manish Bhangale (@bhangale_manish) July 3, 2019
दरम्यान, एकनाथ खडसे याच्या भाषणाच्या व्हिडिओची युट्यूब लिंक शेअर करत मनिष भंगाळे याने 'आय विल गेट बॅक टू यू सर, स्टील आय अॅम अलाईव्ह' आसा थेट इशारा मनिष भंगाळे याने दिला आहे. विशेष म्हणजे 'राष्ट्रहितार्थ एथिकल हॅकिंग' करत असल्याचेही भंगाळे याने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे.