Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

गोंदिया (Gondiya) जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात पोस्टिंग वर असलेल्या एक पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या भाड्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आत्महत्या केल्लेल्या पोलिसांचे नाव ओमप्रकाश रहिले असे असून ते अर्जुनी-मोरगाव येथील रहिवासी होते. ओमप्रकश यांची गोंदिया जिह्यातील देवरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सी- 60 पथकात पोस्टिंग झाली होती, 2011 सालापासून ते पॉलिसी कहत्यात कार्यरत होते. ओमप्रकश यांच्या आत्महत्येच्या मागचे कारण मात्र अद्याप उघड झालेले नाही.

ओमप्रकश राहिले यांच्या आत्महत्यानानंतर आता त्यांच्या कुटुंबावर साहजिकच दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर या घटनेवर देवरी पोलीस स्टेशन मधील नाय कर्मचारीमी मोरगाव येथील आसपासचे रहिवासी साऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी परभणी महदये एका महिला पोलीस कर्मचारेची तिच्याच पती कडून हत्या करण्यात आली होती,

काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार यवतमाळ मध्ये देखील घडला होता. एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यातच गळफास लावून आपले प्राण त्याग केल्याचे समोर आले होते, या प्रकारांमध्ये सहसा कोणत्याही कारणांचा उलगडा होत नाही, पोलिसांवर वाढलेला कामाचा तणाव आणि मानसिक व्याप हे सुद्धा यामागील कारण असू शकेल. असे असल्यास यावर सरकारतर्फे उपाययोजना केल्या जातात का हे पाहणे हे महत्वाचे ठरणार आहे.